Lok Sabha Election 2024 | भाजप नेते, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह मागील दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शाह यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. अमित शाह 4 आणि 5 मार्च रोजी संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर होते , यावेळी अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगरमधून भाजपाचा उमेदवार निवडणूक लढवेल असे संकेत दिले आहेत.
अमित शाह छत्रपती संभाजीनगरमध्ये जनतेशी बोलतांना म्हणाले,’पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी संभाजीनगरातून एक कमळ दिल्लीला गेलं पाहिजे, असं आवाहन शाह केल.
लोकसभा निवडणुकीवरून राजकीय पक्षांमध्ये कोण कुठल्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याची चर्चा रंगली आहे. राजकीय वर्तुळात भाजपा या मतदारसंघात कराड यांच्याबद्दल विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळाच चालू आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड हे संभाजीनगरमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे भाजपा कराडांना संभाजीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकते. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला
हा गेल्या तीन दशकांपासून छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. या लोकसभा मतदारसंघात सात वेळा शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा या मतदारसंघात अवघ्या ५ हजार मतांनी पराभव झाला होता. एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी खैरेंना या मतदारसंघात धूळ चारली होती.
शिवसेनेच्या शिंदे गटाने छत्रपती सभाजीनगरच्या जागेवर दावा
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाकडून मोर्चे बांधणीला सुरूवात झाली आहे. चर्चा शीही आहे की, महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळू शकते. चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाने छत्रपती सभाजीनगरच्या जागेवर दावा केला आहे. मात्र अमित शाह यांचा नुकत्याच झालेला दौऱ्यात ते जनतेशी बोलतांना म्हणाले,’ संभाजीनगरातून एक कमळ दिल्लीला गेलं पाहिजे.’ या आवाहनावरून शिंदे गट नव्हे, छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ भाजपाला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा
Pankaja Munde । पंकजा मुंडे भरसभेत अमित शाहसमोर बोलून गेल्या,’पडदा गिर चुका है…’