Lok Sabha Election 2024 ।आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहताना दिसत आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अबकी बार ४०० पार असा नारा देत पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेत येणार असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, मोदींच्या घरच्या मतदारसंघातून भाजपचे टेंशन वाढवणारी बातमी समोर येत आहे.
गुजरातमधील वडोदरा मतदारसंघावरून राजकारण तापले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या विद्यमान खासदार रंजनबेन भट्ट यांनी येथून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी या जागेवरून रंजनबेन भट्ट यांना तिसऱ्यांदा तिकीट देण्यात आले होते, मात्र त्यांनी आता उमेदवारी मागे घेतली आहे. रंजनबेन भट्ट गेल्या 2 वेळा येथून खासदार आहेत.
खरे तर नुकतेच भाजपचे आमदार केतन इनामदार यांनी येथून राजीनामा मागे घेतला होता. तेव्हापासून रंजनबेन विरोधात पोस्टर वॉर सुरू झाले होते. 2014 मध्ये पीएम मोदींनी या जागेवरून बंपर विजय मिळवला होता. त्यानंतर पोटनिवडणूक झाली तेव्हा रंजनबेन यांना संधी देण्यात आली आणि त्याही या जागेवरून विजयी झाल्या. त्यानंतर 2019 मध्येही रंजनबेन यांना तिकीट देण्यात आले आणि त्या विक्रमी फरकाने विजयी झाल्या. यावेळी भाजपने रंजनबेन यांना वडोदरामधून तिकीट देऊन सलग तिसऱ्यांदा रिंगणात उतरवले होते.
Lok Sabha Election 2024 । रंजनबेन यांची सोशल मीडिया पोस्ट
रंजनबेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्या वैयक्तिक कारणांमुळे माघार घेत असल्याचे बोलले जात आहे. रंजनबेन यांच्या उमेदवारीवरून काही दिवसांपूर्वी पोस्टर वॉर सुरू झाले होते. यातील काही पोस्टर्समध्ये ‘मोदी तुमच्या विरोधात नाहीत, रंजन तुमच्यासाठी चांगले नाही’ असे लिहिले होते. काहींनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरात भाजपचे प्रमुख सीआर पाटील यांना शहराबद्दल आस्था नसल्याचा आरोपही केला.
गुजरातमधील लोकसभेच्या 26 जागांपैकी भाजपने 22 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये रंजनबेन यांच्यासह चार महिलांच्या नावांचा समावेश आहे. रंजनबेन यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर आता केवळ 3 महिला उमेदवार उरल्या आहेत.
हे वाचले का ? ऐकावं ते नवलच; आगीत पुस्तकांचे दुकान झाले भस्मसात पण बायबल ‘सुरक्षित’