OICL Recruitment 2024 : ओरिएंटल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीत प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरती होणार आहे. या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेत प्रशासकीय अधिकाऱ्यांची शंभर पदे भरायची आहेत. इच्छुक उमेदवार orientalinsurance.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची लिंक आजपासून म्हणजेच 21 मार्च रोजी सक्रिय झाली आहे.
ओरिएंटल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारी भरतीसाठी नोंदणी विंडो 21 मार्च रोजी सुरु झाली असून 12 एप्रिल 2024 रोजी बंद होईल. या कालावधीत उमेदवारांनी त्यांचा अर्ज भरून सादर करावा.
कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त ?
OICL ने प्रशासकीय अधिकारी पदाच्या एकूण 100 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये अकाउंट्ससाठी 20 पदे, एक्टियेरियससाठी 5 पदे, इंजिनिअरसाठी 15 पदे, आयटी इंजिनिअर 20 पदे, वैद्यकीय अधिकारासाठी 20 पद आणि इतर 20 पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
OICL AO भरतीसाठी अर्ज करण्यासाठी विविध शैक्षणिक पात्रता विहित केलेली आहेत. अर्जदारांसाठी किमान वय मर्यादा २१ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे ठेवण्यात आली आहे.
अर्ज फी
OICL AO भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनारक्षित, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. तर, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) च्या उमेदवारांना 250 रुपये शुल्क जमा करावे लागेल.
असा करा ऑनलाइन अर्ज
सर्वप्रथम orientalinsurance.org.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
होमपेजवर जा आणि ‘OICL AO Recruitment 2024 Apply Online’ या लिंकवर क्लिक करा.
येथे तुमची नोंदणी करा, तुमच्या मोबाईलवर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड येईल.
पुढे, अर्ज पूर्ण करा, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
अर्ज फी भरा आणि सबमिट वर क्लिक करा.