Lok Sabha Election 2024 । Star Campaigner : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हटल्या जाणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा 2024 च्या निवडणूकांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, संपूर्ण देशात निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे. देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणूकांची 16 मार्च रोजी घोषणा करण्यात आली आहे. देशात 19 एप्रिल ते 1 जून अशा 44 दिवसांच्या प्रदीर्घ काळात एकूण सात टप्प्यात निवडणूका होणार आहेत.
महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत पाच टप्प्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. आणि 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी 7 जागांवर आणि पश्चिम बंगालच्या 42 लोकसभा जागांपैकी 3 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. । Lok Sabha Election 2024 । Star Campaigner
दरम्यान, अश्यातच निवडणूकांसाठी भाजपाने अब की बार 400 पारचा नारा दिला आहे. या निवडणूकांसाठी भाजपाने आपल्या स्टार कॅंपेनरची यादी निवडणूक आयोगाला पाठविली आहे, या यादीत स्टार कॅंपेनर म्हणून एकूण 40 जणांची नावे समाविष्ट केली आहेत.
महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच नुकतेच काँग्रेसमधून भाजपत आलेले आणि विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण, रिपाईं अध्यक्ष रामदास आठवले, अन्नामलाई यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तब्बल 40 जणांची नावे यामध्ये देण्यात आली आहे.
प्रत्येक निवडणुकीत सर्व पक्ष आपले स्टार प्रचारक घोषित करत असतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का? ‘स्टार प्रचारक’ म्हणजे काय असतं? कुणाचे नाव स्टार प्रचारक म्हणून घोषित करतात? अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला देणार आहोत…. । Lok Sabha Election 2024 । Star Campaigner
स्टार प्रचारक म्हणजे नेमकं काय? । Lok Sabha Election 2024 । Star Campaigner
निवडणूक जिंकण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष अशा नेत्याला किंवा सेलिब्रिटींना प्रचारात उतरवतात, ज्यांच्या प्रभावामुळे, त्यांना पाहण्यासाठी, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी, त्यांच्या रॅलीमध्ये लोक प्रचंड गर्दी करतात. अशा व्यक्तींना स्टार प्रचारक म्हणतात.
या स्टार प्रचारकांमुळे लोकांचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता असते. या स्टार प्रचारकांचे भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होत असल्याचे आजवरचे चित्र आहे. यामुळे अशा प्रचंड गर्दीच्या सभा पाहून जनसामान्यांवर अर्थातच मतदारांवर याचा चांगलाच प्रभाव पडतो. परिणामी त्या पक्षाला मत मिळण्यास फायदा होतो.
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराला आपला प्रचार करण्यासाठी आपण स्टार प्रचारक आणावा असे वाटत असते. मात्र यावर खूपच खर्च होतो. या खर्चावर निवडणूक आयोगाची कावळ्याची नजर असते.
निवडणूक प्रचारासाठी कमी वेळ असल्यामुळे आणि प्रत्येक ठिकाणी स्टार प्रचारकाला जाणे शक्य व्हावे यासाठी विमान, हेलिकॉप्टर यासारखा खर्च जास्त असणाऱ्या साधनांचा उपयोग केला जातो. स्टार प्रचारकाचा होणारा हा सर्व खर्च निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला करावा लागत नाही.
कारण हा सर्व खर्च त्यांच्या पक्षामार्फेत होत असतो. त्यामुळे स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाला संधी द्यायची आणि नाही हा निर्णय त्या पक्षाचा असतो. स्टार प्रचारक यांचा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं यापूर्वी देखील पाहायला मिळालं आहे.
भाजपचे स्टार प्रचारक कोण आहेत? । Lok Sabha Election 2024 । Star Campaigner
- नरेंद्र मोदी
- जगतप्रकाश नड्डा
- राजनाथ सिंह
- अमित शाह
- नितीन गडकरी
- योगी आदित्यनाथ
- प्रमोद सावंत
- भूपेंद्रभाई पटेल
- विष्णूदेव साय
- मोहन यादव
- भजनलाल शर्मा
- एकनाथ शिंदे
- अजित पवार
- रामदास आठवले
- नारायण राणे
- अनुराग ठाकूर
- ज्योतिरादित्य शिंदेस्मृती इराणी
- रावसाहेब दानवे पाटील
- शिवराज सिंह चौहान
- देवेंद्र फडणवीस
- सम्राट चौधरी
- अशोक चव्हाण
- विनोद तावडे
- चंद्रशेखर बावनकुळे
- आशिष शेलार
- पंकजा मुंडे
- चंद्रकांत पाटील
- सुधीर मुनगंटीवार
- राधाकृष्ण विखे पाटील
- पीयूष गोयल
- गिरीश महाजन
- रवींद्र चव्हाण
- के. अण्णामलई
- मनोज तिवारी
- रवी किशन
- अमर साबळे
- विजयकुमार गावित
- अतुल सावे
- धनंजय महाडिक