येरवडा (प्रतिनिधी) :- लोहगाव, कलवड येथील फर्निचरच्या गोडावूनला दुपारी 3.30च्या सुमारास आग लागली होती. पीव्हीसी मटेरियल आणि केमिकलमुळे आग जास्त भडकली.
अग्निशामक दलाच्या नायडू रुग्णालय आणि येरवडा अग्निशामक दलाचे जवान सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर, पोलीस मित्र नाजीम शेख,अमोल कान्हू, नजीर इंडीकर, रफिक शेख, यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1341458469527188/
या ठिकाणी असलेल्या अरुंद रस्त्यामुळे तसेंच रस्त्यावर लावलेल्या वाहनांमुळे अग्निशामक दलाच्या वाहनांना आग लागलेल्या ठिकाणी पोहचण्यास वेळ लागला. रस्त्यावर असलेले अतिक्रमणे काढावीत अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. अतिक्रमणे काढण्यासाठी अनेकदा स्थानिक नगरसेवक आणि पालिका प्रशासनाकडे केली आहे मात्र ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही मलंग शेख यांनी केली.