यवत -करोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लॉकडाऊनमुळे सलून व्यवसायाला सर्वात मोठी झळ बसली आहे. सरकारने लॉकडाऊन शिथील केला असून इतर व्यवसायाला परवानगी दिली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सलून व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
राज्य सरकारने सलून व्यावसायिकांना कर्नाटक सरकारच्या धर्तीवर आर्थिक मदत करावी, अशी मागणी नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश साळुंके यांनी आमदार राहुल कुल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.