पुणे – लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीच्या वतीने स्व. ला. सागर डोमसे यांच्या स्मरणार्थ लायन्स व्हेट्रेन टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत रॉयल पासलकर, स्वयुश स्ट्रायकर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून आगेकूच केली.
मोशी येथील हजारे मैदान व थेरगाव येथील व्हेरॉक मैदानावर सूरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत समीर तांबोळी (४-१४) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर स्वयुश स्ट्रायकर्स संघाने मेव्हरिक्स लिजेंडस क्लबचा दोन गडी राखून पराभव करत दुसऱ्या विजयाची नोंद केली. दुसऱ्या सामन्यात देवदत्त देवकर याने केलेल्या धडाकेबाज ७३ धावांच्या जोरावर रॉयल पासलकर संघाने लवास रॉयल्स संघाचा ५ गडी राखून पराभव केला.
निकाल (साखळी फेरी)
मेव्हरिक्स लिजेंडस क्लब : १५.३ षटकात सर्वबाद 84 (दिग्विजय मोहिते ४४, समीर तांबोळी४-१४, किरण भोसले ३-२१ पराभुत वि. स्वयुश स्ट्रायकर्स: १६ षटकात ८ बाद ८५ धावा(श्रीनिवास सरवदे ३०, संतोष पाटोळे १९, विजय नवले ३-७, हेमंत बढे ३-१४); सामनावीर – समीर तांबोळी; स्वयुश स्ट्रायकर्स संघ 2 गडी राखून विजयी
#U19WorldCup2024 : टीम इंडियासह ‘हे’ संघ पात्र ठरले सुपर-6 साठी, ICC ने शेअर केली यादी…
लवास रॉयल्स : २० षटकात ६ बाद १५५ (विशाल बारणे ६७, गणेश कुदळे ४० पराभुत वि. रॉयल पासलकर: १६ षटकात ५ बाद १५७ (देवदत्त देवकर ७३, अभिषेक मोहिते ५६, सचिन थोपटे ३-२८; सामनावीर – देवदत्त देवकर; रॉयल पासलकर संघ ५ गडी राखून विजयी.