मिलान – फुटबॉल या खेळातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणार फिफा सर्वोत्कृष्ट खेऴाडूचा पुरस्कार यंदा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीने मिळवला आहे. मेस्सीने सहाव्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले आहे. इटलीतील मिलानमध्ये फिफा फुटबॉल पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
Congratulations, #LeoMessi
Winner of #TheBest FIFA Men’s Player 2019 ?#TheBest | #FIFAFootballAwards pic.twitter.com/MKh2wV5T1M
— #TheBest ? (@FIFAcom) September 23, 2019
यावेळी, फिफा ‘बेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ या पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सीसोबत रोनाल्डो आणि नेदरलँडच्या वर्जिल वॅन डिकचाही समावेश होता. मात्र, या स्पर्धेत मेस्सीने बाजी मारत हा पुरस्कार आपल्या खिशात घातला. तर, महिला खेळाडूंमध्ये मेघन रॅपिनो हिने पहिल्यांदा फिफा ‘वुमन ऑफ द इयर’ चा पुरस्कार जिंकला आहे.
????#TheBest | #FIFAFootballAwards pic.twitter.com/Num3vEw6GW
— #TheBest ? (@FIFAcom) September 23, 2019
या कार्यक्रमात फुटबॉल खेळातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून लिवरपुल संघाचे जर्गेन क्लॉप यांना सन्मानित करण्यात आले आहे. सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून लिवरपुलच्याच एलिसन बेकर याला गौरवण्यात आले आहे. एलिसन ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाला गोलरक्षक आहे.
A new queen is crowned ?
Sound on please, for #TheBest FIFA Women’s Player #MeganRapinoe #TheBest | #FIFAFootballAwards pic.twitter.com/KrW8eidXm4
— FIFA Women’s World Cup (@FIFAWWC) September 23, 2019
पुरस्कार आणि विजेत्या खेळाडूंची नावे –
सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू- लिओनेल मेस्सी (अर्जेन्टिना/बार्सिलोना)
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू- मेगन रॅपिनो (यूएसए/रिजन एफसी)
सर्वोत्कृष्ट पुरुष गोलरक्षक- एलिसन बेकर (ब्राझील/लिवरपुल)
सर्वोत्कृष्ट महिला गोलकीपर- साडी व्हॅन व्हेनेंदाल (नेदरलँड/एटलेटिको मैड्रिड)
पुरुष प्रशिक्षक- जर्गेन क्लॉप(लिव्हरपूल)
महिला प्रशिक्षक- जिल एलिस (यूएसए)
सर्वोत्कृष्ट गोल- डॅनियल झेझोरी
फेअर-प्ले पुरस्कार- मार्सेलो बिल्सा आणि लीड्स यु