बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला पुन्हा कामावर परत येण्याची चिंता वाटत नाही. करोना काळात इंडस्ट्रीत होणाऱ्या बदलांचीही तिला चिंताही वाटत नाही. तिच्या मते, लॉकडाउन काळातील जीवनही सुंदर असल्याचे अभिनेत्रीने शेअर केले.
सोनाक्षी म्हणाली, “मला लॉकडाउनचे आयुष्य आवडते असे म्हणायला मला काही हरकत नाही. गेल्या दहा वर्षात मी ब्रेक घेतला नाही, जिथे मी स्वतःसाठी वेळ देऊ शकेन. पण करोना काळात मी स्वतःसाठी वेळ काढू शकली. मला आयुष्यातून काय हवे आहे ते समजू शकले. मी या काळात खूप आनंद घेतला आहे, असे तिने सांगितले.
ती म्हणाली, “मला पुन्हा कामाची सुरुवात करण्याबद्दल काळजी वाटत नाही. मला माहित आहे की सेटवर परत येणे खूप अवघड असेल. कारण सद्यपरिस्थितीत सेटवर शूटिंग करताना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
पीपीई किटमध्ये काम करणारे लोक दिसतील. मी नुकतेच एक फोटोशूट केले होते. त्यावेळीमाझ्या आजूबाजूच्या माणसांना डोक्यापासून पायापर्यंत झाकून टाकणे आश्चर्यकारक वाटले. नेहमी हात स्वच्छ करणारे, मास्क घालणे, हे सर्व काही नवीन असल्याचे भासल्याचे तिने सांगितले.