साऊथ सुपरस्टार यश याने स्वत:चा मार्ग निवडत चित्रपटसृष्टीत दमदार वाटचाल करत स्टारडम मिळविले आहे. यासाठी त्याने कठोर मेहनत घेत काम केले आहे. त्याच्या मते, आई-वडिलांचा आशीर्वाद, आनंद आणि त्यांच्या डोळयातील गर्व हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी कामगिरी आहे.
यशसाठी, त्याचे कुटुंब आणि आई-वडील हेच जग आहे. त्याचे वडील हे बस कंडक्टर आणि आई एक गृहिणी होती. दोघांनीही घरातील गरजा भागविण्यासाठी आणि मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट केले. कधी-कधी स्वतःच्या गरजांकडेही दुर्लक्ष केले. अशा कठीण परिस्थितीशी झगडलेल्या आई-वडीलांसाठी तो दृढ निश्चयी बनला असून त्यांचे सर्व स्वप्न तो पूर्ण करू इच्छितो.
सध्याच्या अभिनेत्यांमध्ये यश हा “सेल्फ मेड मॅन’चा सर्वात उत्तम उदाहरण आहे. ज्याने शुन्यातून विश्व निर्माण केले आहे. यशने दृढ संकल्प, प्रामाणिकपणा आणि नियमितता कायम ठेवत आपले साम्राज्य निर्माण केले आहे. त्याच्या या कर्तृत्वाबद्दल त्याच्या आई-वडीलांना खूप अभिमान आहे. कारण त्याने प्रत्येक टप्प्यात आव्हानांवर मात करत एक व्यक्ती म्हणून सिद्ध केले आहे.
यशने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर ही कामगिरी करत त्याने “पॅन इंडिया अभिनेता’ म्हणून एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तसेच “केजीएफ’ चित्रपटातून त्याने एक नवीन उंची गाठली आहे. दरम्यान, सुपरस्टार यश हा केजीएफच्या बहुप्रतिक्षित पुढील सीक्वलमधून पुन्हा एकदा रॉकी भाईच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.