वाघळवाडी: बापुराव गायकवाड(सर्पमित्र)करंजेपुल ता बारामती यांनी कोब्रा सारखा विषारी नाग मोठया जिताफीने पकडून त्याला जीवदान दिले आहे. त्यामुळे गायकवाड यांचे परिसरात मोठे कौतुक होत आहे.
एका खोलीत श्रेया या चिमुकलीने हा नाग पाहताच आरडाओरड केला. सुदैवाने या नागामुळे कुटूंबातील कोणालाही कसलीही इजा झालेली नाही. शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता. तीन दिवसांपासून पाऊस थांबल्याने बिळातील साप बाहेर पडला. करंजेतील विनोद गोलांडे यांच्या राहत्या घरी सोमवार दि २८ रोजी दुपारी साडे तिनच्या सुमारास हा प्रकार घडला.
हा अतिशय विषारी असल्याचे गायकवाड यांनी सांगितले व त्याला सुरक्षित भापकर मळा हद्दीतील वन विभागाच्या हद्दीत सोडण्यात आले. सर्पमित्र गायकवाड म्हणाले, कोब्रा हा अतिशय दुर्मिळ दिसणारा नाग आहे. तो अतिशय विषारी आहे. त्याला कोणताही प्रहार झाला नाही तर तो कुणालाही चावत नाही.