Market Cap : सेन्सेक्समधील ( Sensex ) टॉप 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात एकूण 71,414.03 कोटी रुपयांनी घसरले आहे. या काळात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे ( LIC ) सर्वाधिक नुकसान झाले आहे. पहिल्या 10 मोठ्या कंपन्यांमध्ये LIC व्यतिरिक्त, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ( TCS ), ITC, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली. दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप वाढले. या कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकूण 62,038.86 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
कोणाचे आणि किती नुकसान –
गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 831.15 अंकांनी किंवा 1.16 टक्क्यांनी वाढला. या कालावधीत एलआयसीचे बाजार भांडवल 26,217.12 कोटी रुपयांनी घसरून 6,57,420.26 कोटी रुपयांवर आले. TCS चे मार्केट कॅप 18,762.61 कोटी रुपयांनी घसरून 14,93,980.70 कोटी रुपये झाले.
ITC चे मार्केट कॅप 13,539.84 कोटी रुपयांनी घसरून 5,05,092.18 कोटी रुपये झाले. तर हिंदुस्थान युनिलिव्हरचे मार्केट कॅप 11,548.24 कोटी रुपयांनी घसरून 5,58,039.67 कोटी रुपयांवर आले. भारती एअरटेलचे बाजारमूल्य 703.60 कोटी रुपयांनी घसरून 6,30,340.9 कोटी रुपयांवर आले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 642.62 कोटी रुपयांनी घसरून 19,76,493.92 कोटी रुपये झाले.
या कंपन्यांचा फायदा झाला –
अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज बुधवारी 20 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप गाठणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. मंगळवारीही रिलायन्सचे मूल्यांकन 20 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते. मात्र, दिवसअखेर तो 19.93 लाख कोटी रुपयांवर बंद झाला.
याशिवाय, SBI चे बाजार भांडवल 27,220.07 कोटी रुपयांनी वाढून 6,73,585.09 कोटी रुपये झाले आहे. इन्फोसिसने या आठवड्यात 13,592.73 कोटी रुपयांची भर घातली आणि तिचे मूल्यांकन 7,06,573.08 कोटी रुपयांवर पोहोचले. HDFC बँकेचे मार्केट कॅप 12,684.58 कोटी रुपयांनी वाढून 10,78,493.29 कोटी रुपये आणि ICICI बँकेचे मार्केट कॅप 8,541.48 कोटी रुपयांनी वाढून 7,17,796.25 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
टाॅप 10 कंपन्या –
टॉप 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एसबीआय, एलआयसी, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी यांचा क्रमांक लागतो.