सिंगापूरकडून भारताला विश्‍वासार्हतेचे पत्र

नवी दिल्ली – सिंगापूर येथे उच्चायुक्त म्हणून नियुक्त केलेले सायमन वोंग वी कुएन यांच्याकडून आज एका आभासी कार्यक्रमात विश्‍वासार्हतेच्या पत्राचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकार केला. 

या प्रसंगी राष्ट्रपतींनी उच्चायुक्तांना त्यांच्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. अलीकडेच यशस्वीपणे पार पडलेल्या झालेल्या निवडणुकांबद्दल सिंगापूर सरकारचे अभिनंदन केले.

भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध दृढ होत असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह बहुपक्षीय मंचांवर भारताला सशक्त पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सिंगापूरचे आभार मानले.

कोविड-19 महामारीच्या काळात दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्यामुळे मैत्री आणि विश्‍वास अधिक दृढ झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.