नागपूर : शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा एकदा विरोधकांच्या आरोपामुळे चर्चेत आले आहेत. अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा आरोप होत असून अधिवेशनात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली आहे. यावर आज सत्तार हे विधिमंडळात उत्तर देणार आहे. त्यामुळे सत्तार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एक सूचक ट्विट केले आहे. ‘राजीनामा घेऊच तोही व्याजासहित..,’ असे मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काय होणार? हे पाहणे गरजेचे आहे.
राजीनामा घेऊच तोही व्याजासहित….
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 26, 2022
शिंदे-भाजप सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सत्तार यांनी वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृत रित्या वाटप केल्याचा आरोप आहे. यावरून विधानसभेत अजित पवारांसह विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
तर ‘माझ्यावर झालेले आरोप सभागृहात झाले असल्याने याला उत्तर देखील सभागृहातच देणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.