डोर्लेवाडी (नवनाथ बोरकर) – दोन वर्षांपूर्वी बारामती तालुक्यात नर मादी बिबट्याने धुमाकूळ घातला होता यात अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या या बिबट्यांनी फस्त केल्या होत्या यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आता पुन्हा एकदा बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील अर्जुन थोरात व माणिक कोळेकर यांच्या ऊसाच्या शेतामध्ये जंगली प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत.
हे ठसे बिबट्याचे की अन्य प्राण्याचे हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. रेस्क्यू टीमकडून झारगडवाडी येथील शेतात आढळून आलेल्या ठशाची पाहणी करण्यात आली आहे अद्याप हे ठसे कुठल्या प्राण्याचे आहेत हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन दिवसांपूर्वी पिंपळी- झारगडवाडीच्या शीवेवरील विठ्ठल जाधव यांच्या ऊसाच्या शेतात देखील अशाच प्रकारचे ठसे आढळून आले होते. आणि आता झारगडवाडी येथील थोरात, कोळेकर यांच्या उसाच्या शेतात ठसे आढळून आले आहेत या ठशाचे फोटो काढण्यात आले आहेत. नेमके कुठल्या जंगली प्राण्यांच्या पायाचे ठसे आहेत हे समजले नाही रेस्क्यू टीमकडून ठशाची पाहणी करण्यात आली आहे.
ते ठसे कशाचे आहेत हे लवकरच स्पष्ट होईल तोपर्यंत शेतकर्यांनी रात्री-अपरात्री शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी जाताना बॅटरी जवळ ठेवावी. वन्य प्राणी दिसल्यास हुसकावण्यासाठी काठी सोबत ठेवावी.
वनविभागाची मदत आवश्यक असल्यास 1926 अथवा 7507954466 या दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा, असे असे आवाहन वनरक्षक बाळासाहेब गोलांडे यांनी नागरिकांना केले आहे.