अकोले (प्रतिनिधी) – भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने भंडारदरा धरणातून ८८१२ क्युसेकने तर निळवंडे धरणातून १० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग प्रवरा नदिपात्रात सोडण्यात आले असुन पर्जन्यमाण वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रवरा काठच्या गावानी सतर्क राहावे असे आवाहन जलसंपदा भंडारदरा शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी केले आहे.
भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू आसल्याने पाण्याच्या विसर्गात वाढ केली जात आहे सद्या भंडारदरा धरणात ११०३९ द.ल.घ.फु व निळवंडे धरणात ८०८१ द.ल.घ.फु पाणी साठा आहे.
धरणात आवक सुरु असल्याने भंडारदरा धरणाच्या स्पिलवे गेट मधून ७९९८ क्युसेकने व विद्युतगृहातुन ८१४ क्युसेक असा एकुण ८८१२ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे तर निळवंडे धरणाच्या स्पिलवे गेटने ९३४० क्युसेक व विद्युत गृहातुन ६६० क्युसेक असा एकुण १० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग प्रवरा नदिपात्रात सोडण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास प्रवरा पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे .प्रवरा नदिपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सुरू असल्याने नदीला पुर आलेला आहे .पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता असल्याने प्रवरा काढच्या लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन जलसंपदा विभागाचे वतिने शाखा अभियंता देशमुख यांनी केले आहे