पिंपरी चिंचवड : देशाच्या स्वातंत्र्याला १५ ॲागस्ट रोजी ७५ वर्षे पुर्ण होत आहेत. यंदा १५ ॲागस्ट हा स्वातंत्र्यदिन ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणुन देशभरात साजरा केला जातोय.
याच पार्श्वभुमीवर अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानात तिरंग्याच्या रंगात आणि देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून लेजर शो केला आहे.
हा लेजर शो पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. हा लेजर शो रात्री साडेसात ते आठ या वेळेत होत आहे.