कायद्याचा सल्ला

आमची सदाशिव पेठ, पुणे या ठिकाणी स्वतःची मिळकत आहे. सदर मिळकतीमध्ये तीन खोल्यांमध्ये एक भाडेकरू तीन महिने भाड्याने रहात आहे. आमच्या मिळकतीमध्ये आपल्याकडे फक्त 2 खोल्यांचा ताबा आहे. आमची जागा आम्हास अपुरी असल्यामुळे आम्ही स्वतःला वापरण्यासाठी जागा हवी आहे, म्हणून आमचे मिळकतीत असलेल्या भाडेकरूविरुद्ध दावा लावला होता. त्याचा निकाल आमचे बाजूने लागला आहे व सदर निकाल मे. उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडून देखील कायम झाला आहे. आमचा भाडेकरू एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे व तो आम्हास जागेचा ताबा घेताना त्रास देण्याची व हरकत घेण्याची शक्‍यता आहे. तरी आम्ही याबाबतीत काय करावे?
आपणाकडे असलेल्या हुकूमनाम्याचे आधारे आपण मे. न्यायालयामध्ये भाडेकरूविरुद्ध दरखास्त अर्ज दाखल करावा. या दरखास्तीचे मे. न्यायालय आपले भाडेकरूस कारणे दाखवा नोटीस देईल. त्यामध्ये भाडेकरूचे काही म्हणणे असल्यास कोर्ट त्याप्रमाणे आपणास ताबे वॉरंटचा हुकून देईन. या ताबे वॉरंटच्या हुकूमाच्या बजावणीसाठी मे. कोर्टातील बेलिफ भाडेकरूचे खोलीचा ताबा घेण्यास येतील. त्यावेळेस “भाडेकरूने शांतता भंग केला अथवा हरकत घेतली,’ असा अहवाल बेलिफ मे. न्यायालयात दाखल करतील. मग आपणास मे. कोर्टाकडून पोलिसांची मदत घेऊन कुठल्याही हरकतीचा विचार न करता ताबा घेण्यासाठी हुकूम करेल. या हुकुमाचे आधारे आपणास पोलिसांकडून संरक्षणात ताबा घेण्यासाठी पोलीस भत्ता भरावा लागेल व मग आपण कोर्टातील बेलिफ व पोलीस यांना घेऊन भाडेकरूचा ताबा मिळवून देतील.

भाडेकरूचे घरातील पंचनामा करतील. जर आपले भाडेकरूने सदर सामान घेण्यास नकार दिला तर सदर सामान बेलिफ जप्त करून मे. कोर्टाचे नाझर ऑफिसमध्ये जमा करतील व अशा रितीने आपल्याला भाडेकरूच्या ताब्यात खोल्या मिळतील. त्यानंतर देखील आपण भाडेकरूविरुद्ध दरम्यानचे उत्पन्नासाठी किरकोळ अर्ज करू शकतात. या दरम्यानचे उत्पन्नाचे अर्जामध्ये आपण भाडेकरूविरुद्ध दावा दाखल झाल्यापासून ताबा मिळेपर्यंत त्या भागातील चालू असलेल्या भाड्याची रकमेची मागणी करू शकता व त्याबाबत आपणास न्यायालयाकडून रक्कम वसुलीचा हुकूमनामा मिळेल.

आम्ही कोर्टामध्ये वुईलद्वारे प्रोबेट मिळण्याचा अर्ज केला आहे. या वुईलमध्ये असलेले साक्षीदार यांनी वुईलवर त्यांच्या सह्या असल्याचे व वुईल करताना ते त्या ठिकाणी हजर असल्याचे मान्य व कबूल केले आहे. परंतु “वुईलमध्ये असलेल्या मजकुराची माहिती नाही,’ अशी साक्ष साक्षीदार यांनी मे. न्यायालयात दिली आहे तर आता आमचे वुईल मे. न्यायालय मान्य करेल का व आम्हास प्रोबेट देईल का?
प्रोबेट म्हणजे मे. न्यायालयीन मान्य केलेले वुईल असते. आपण आपल्या वुईल अर्जामध्ये व्यवस्थित अर्ज करून पुरावे दिले असतील तर आपणास प्रोबेट मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार जरी एखाद्या वुईलमध्ये असणाऱ्या साक्षीदारांना वुईलमधल्या मजकुराची माहिती नसेल, तरी त्यातील साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून प्रोबेटचा हुकूम दिला जाऊ शकतील. त्यामुळे आपणास प्रोबेट मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही. आपण या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची माहिती आमल्या चालू असलेल्या न्यायालयास द्यावी.

“मी त्याच्याबरोबर नांदत नाही व मी त्याच्या घराचा स्वेच्छेने त्याग केला आहे,’ या कारणास्तव मी घटस्फोट घेतला आहे. मला स्वतःचे उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही. तरी मी माझे घटस्फोटीत पतीकडून पोटगी मागू शकते का?
आपला व पतिबरोबर कायदेशीर घटस्फोट झाला असला तरी आपणास क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 125 अन्वये अर्ज करून पोटगी मागण्याचा कायद्याने हक्क व अधिकार आहे. या कलमामध्ये पत्नी या शब्दामध्ये घटस्फोटीत पत्नीचा देखील समावेश होतो. सदर कलमातील कलम 125(4) मधील असलेल्या अपवादामध्ये आपली केस येणार नाही. कायद्याप्रमाणे प्रत्येक पुरुषांस त्यांचे पत्नीला पोटगी देण्याची जबाबदारी आहे. (र्कीीलरपव ळी र्लीेपव ीें ारळपींशपरपलश हशी ुळषश) असे कायद्याचे प्रिन्सीपल आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयात एका निकालपत्रात असा निकाल दिला आहे. त्यामुळे आपण देखील आपले घटस्फोटीत पतिविरुद्ध कलम 125 प्रमाणे पोटगीसाठी अर्ज करावा व त्यामध्ये वरील केसचा संदर्भ द्यावा म्हणजे तुम्हास तुमचे घटस्फोटीत पतीकडून पोटगी मिळू शकेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)