पुणे : शिवजयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अहमदनगर येथील शिवव्याख्याते अफसर शेख यांचे शिवराय ते भीमराय या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्यान आज २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील ज्ञानेश्वर सभागृहात संपन्न होणार आहे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या व्याख्यानाला अधिकाधिक शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
– विष्णू नाझरकर ,
कॉलेज रिपोर्टर
राज्यशास्त्र विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ