पुणे -लॉकडाऊनमध्ये लर्निंग लायसन्सची (शिकाऊ परवाना) मुदत संपुष्टात आली आहे. या लायसन्सधारकांना राज्य परिवहन विभागाने दिलासा दिला असून संबंधित लायसन्सची वैधता 30 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊनमुळे मार्च अखेरपासून प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) बंद आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिककाळ कार्यालय बंद असल्याने वाहन परवाना काढणे, नूतनीकरण आदी बंदच आहे.
या पार्श्वभूमीवर मोटार वाहन अधिनियम 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 अंतर्गत संबंधित विविध कागदपत्रांच्या वैधतेबाबत केंद्र शासनाने राज्याला निर्देश दिले आहेत.