हिंदी दिवस : अजय देवगण आणि रणदीप हुड्डाने दिल्या शुभेच्छा

मुंबई – आजचा दिवस ‘जागतिक हिंदी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. जगात हिंदी भाषेचा प्रसार करण्याच्या हेतूने हा दिवस साजरा करण्यात येतो. आज विविध उपक्रमांद्वारे हिंदी साहित्यातील कर्तृत्ववान मंडळींना वंदना देण्यात येते. सोशल मीडियावरही आजचा दिवस साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने अनेक बॉलीवूडच्या कलाकारांनी हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि रणदीप हुड्डा यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून समस्त भारतीयांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रणदीपने संत कबीर यांच्या शब्दात म्हणजेच ‘बुरा जो देखन मैं चलया, बुरा ना मिलया कोय।’ असे ट्विट करुन शुभेच्छा दिल्या. अजय देवगणने ‘हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा’ असे ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×