कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला एका-मागून-एक धक्के बसताना दिसत आहेत. आज ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री लक्ष्मी रतन शुक्ला ( laxmi ratan shukla resigns ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी तृणमूलमधील काही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, शुक्ला यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “मला त्यांचे राजीनामपत्र मिळाले आहे. लक्ष्मी हा चांगला तरुण आहे त्याला क्रीडा क्षेत्रामध्ये परतायचे आहे. याबाबत कोणताही गैरसमज करून घेण्याची गरज नाही. ते आमदार म्हणून यापुढेही कार्यकर्त राहणार असून मी राज्यपालांना त्यांचा राजीनामा स्वीकारण्याबाबतची शिफारस केली आहे.”
लक्ष्मी रतन शुक्ला हे बंगालच्या रणजी संघाचे माजी कर्णधार असून त्यांनी 2016मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी हावडा विधानसभा मतदारसंघातून पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ( laxmi ratan shukla resigns )
दरम्यान, ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पात्रात शुक्ला यांनी आपल्याला राजकारणातून निवृत्ती घ्यायची असल्याचं म्हंटलंय.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमोर भाजपने मोठं आव्हान उभं केलं असून तृणमूलचे जुने शिलेदार सुवेंदू अधिकारी भाजपच्या गोटामध्ये सामील झाल्याने ममता यांना पुढील निवडणूक अवघड जाणार असल्याचं बोललं जातंय. ( laxmi ratan shukla resigns )
तत्पूर्वी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी बंगालमध्ये एका कार्यक्रमात बोलताना, ‘निवडणुका येईपर्यंत तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी एकट्याच उरतील’ असं वक्तव्य केलं होत.