चिंबळी – गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण राज्यात करोना रोगाच्या महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्व जनता हैराण झाली असल्याने यावर प्रतिबंधक उपाय म्हणून राज्य सरकारच्या वतिने पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण राबविण्यात येत आहे.
करोना रोगाच्या नियंत्रणासाठी या संकटावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय असल्याने गेल्या दोन दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त सीरम इन्स्टिट्यूट व जगदंबा प्रतिष्ठाण यांच्या पुढाकाराने पाच लाख लसीच्या मात्रा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
खेड तालुक्यात ५० हजार लस उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये प्रत्येक गावामध्ये लसीकरण मोहीम राबविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हडपसर, भोसरी परिसरातील सर्व ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे यांनी कुरुळी येथे बोलतांना सांगितले.
लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कुरुळी ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती अरुण चौधरी, माजी सभापती विलास कातोरे ,ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल, सरपंच शिल्पा सोनवणे, उपसंरपच विशाल सोनवणे, माजी उपसरपंच एम. के. सोनवणे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष गुलाब सोनवणे, चेअरमन बाळासाहेब कांबळे, माजी देवराम सोनवणे, सरपंच युवा उद्योजक भरत कड, सर्व सदस्य तसेच आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.