नेवासा – जालना येथील सकल मराठा आंदोलकांवर लाठ्या काठ्यांनी मारत तुडवले गेले. यामध्ये अनेकांचे डोके फुटले तर कोणाचे नाक फुटले. छऱ्यांच्या बंदुकांनी फायरिंग केली गेली. मराठा आरक्षण आंदोलकांवर दडपशाही करून आंदोलन चिरडणाऱ्या सरकारचा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने भेंडा (ता.नेवासा) येथे निषेध करण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक कमलेश नवले म्हणाले, मराठ्यांनी आता हातात लेखणी घेतली आहे परत एकदा त्यांना तलवार घ्यायला भाग पाडू नका, असा इशारा दिला.
याप्रसंगी लहुजी सेनेचे प्रमुख सुरेश आढगळे, छत्रपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर, प्रदिप आरगडे, ऋषी नवले, कल्याण ठुबे, मयूर बोधक, शुभम आरगडे, सुधीर आरगडे, आप्पासाहेब आरगडे, रोहित रुईकर, शुभम गव्हाणे, शिवसेनेचे महिला प्रमुख मीरा गुंजाळ, अरविंद आरगडे, निलेश आरगडे, प्रतिक आरगडे, सिद्धांत आरगडे, ज्ञानेश्वर चामुटे, संकेत आरगडे, राहुल बोधक, सचिन तागड, दीपक नवले, सूरज आरगडे, ऋषी आरगडे, अक्षय चामुटे, रघुनाथ आरगडे, मुकेश आरगडे, प्रशांत आरगडे, अक्षय बोधक, राम आरगडे, प्रसाद पाटोळे, अनिल थोडे, विशाल निपुंगे, सुनील महाजन, प्रविण चक्रनारायण, प्रविण थोरात, सोपान औताडे, योगेश आरगडे, शाम आरगडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.