नगर- स्व.शंकरराव घुले यांनी हमाल-मापाडी, कष्टकऱ्यांसाठी आपले आयुष्य वेचले. कष्टकाऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी पतसंस्थेची स्थापना, हॉस्पिटलची उभारणी, गुणवंत पाल्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यांच्यामुळेच आज हमालानां त्यांचे हक्क मिळू लागले आहेत. हमालांसाठी त्यांनी राज्यभर मोठा लढा दिला. त्याची शासनाला दखल घ्यावी लागली व हमाल-मापाड्यांची मोठ्या त्रासातून सुटका झाली, असे प्रतिपादन कॉ. बाबा आरगडे यांनी केले.
हमाल पंचायतीचे माजी अध्यक्ष स्व.शंकरराव घुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहा.कामगार आयुक्त नितीन पाटणकर, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, सल्लागार कॉ.बाबा आरगडे, अशोक बाबर, विष्णूपंत म्हस्के, ऍड.विक्रम वाडेकर, प्रा.गणेश भगत आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पाटणकर म्हणाले, स्व.शंकरराव घुले यांनी कष्टकऱ्यांसाठी मोठे योगदान दिले आहे. यावेळी अध्यक्ष घुले म्हणाले, स्व.शंकरराव घुले यांना हमाल-मापाडी यांच्याबद्दल तळमळ होती. त्यामुळेच हमाल-मापाड्यांसाठीच्या शासनाच्या विविध योजना लागू करुन घेतल्या. कष्टकऱ्यांबरोबरच त्यांचे कुटूंब व पाल्यांच्या शिक्षणासाठीही मदतीचा हात दिला.