कंगनाचा ॲनिमल डायरेक्टर संदीप रेड्डी वंगासोबत काम करण्यास नकार

Kangana Ranaut बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना प्रत्येक मुद्द्यावर बेधडक बोलत असते. कंगनाने काही काळापूर्वी संदीप रेड्डी वंगा यांच्या ॲनिमल या चित्रपटावर टीका केली होती. रणबीर कपूरवरही तिने निशाणा साधला होता. कंगनाने चित्रपटावर टीका केल्यानंतर दिग्दर्शक संदीपने सांगितले होते की, ‘मी कंगनाच्या टीकेकडे लक्ष देत नाही.संदीपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाचे कौतुक करत तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.’ यावर कंगनाने उत्तर दिले आहे.
समीक्षा और निंदा एक नहीं होते, हर तरह की कला की समीक्षा और चर्चा होनी चाहिए यह एक सामान्य बात है ।
संदीप जी ने जैसे मेरी समीक्षा पे मुस्कुराते हुए मेरे प्रति आदर का भाव दिखाया, ये कहा जा सकता है की वो सिर्फ़ मर्दाना फ़िल्में ही नहीं बनाते, उनके तेवर भी मर्दाना हैं, धन्यवाद सर 🙏… https://t.co/qi2hINWYcu— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 5, 2024
सध्या संदीप ॲनिमलच्या यशाचा आनंद घेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर खूप पसंत केला जात आहे. सगळेच त्याचे कौतुक करत आहे. मात्र, या चित्रपटाबाबत अनेक वाद निर्माण झाले आहे.
अशात कंगनासोबत काम करण्याबाबत संदीपने इच्छा व्यक्त केल्यानंतर अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने ट्विट केले, ‘समीक्षा आणि टीका एकच नसतात, प्रत्येक कलेची समीक्षा आणि चर्चा व्हायला हवी, हे सामान्य आहे. संदीपजींनी हसत हसत माझ्या समीक्षेबद्दल ज्या प्रकारे आदर दाखवला ते पाहून असे म्हणता येईल की ते केवळ मर्दानी चित्रपटच बनवत नाहीत तर त्यांची वृत्तीही मर्दानी आहे, धन्यवाद सर…!’
कंगनाने पुढे लिहिले, ‘पण प्लीज मला कोणतीही भूमिका देऊ नका, नाहीतर तुमचे अल्फा पुरुष नायक स्त्रीवादी होतील आणि तुमचे चित्रपटही मार खाऊ लागतील. तुम्ही ब्लॉकबस्टर बनता आणि फिल्म इंडस्ट्रीला तुमची गरज आहे.’ असं म्हणत तिने संदीप रेड्डी वंगा सोबत कधीच काम न करण्यास सांगितले.





