लेडी गागाने संस्कृत पोस्ट श्‍लोक पोस्ट केला

पॉप गायिका आणि हॉलिवूडची अभिनेत्री लेडी गागाने रविवारी ट्‌विटरवर चक्क एक संस्कृत श्‍लोक पोस्ट केला आणि सगळ्यांना आश्‍चर्याचा धक्काच दिला. “लोकाः समस्ताः सुखिनो भवंतु।’ हा श्‍लोक तिने पोस्ट केला. जगातील सर्व लोक सुखी राहू देत, असा या श्‍लोकाचा अर्थ आहे. लेडी गागासारख्या हॉलिवूडच्या पॉप गायिकेकडून संस्कृत श्‍लोक पोस्ट झाल्याने भारतीय खूष झाले, तर इतर सगळेजण आचंबित झाले.

बहुतेकांना या श्‍लोकाचा अर्थच समजला नसावा. किंवा लेडी गागाने हा श्‍लोक का पोस्ट केला, यामागचे कारणच लक्षात आले नसावे. या श्‍लोकाच्या अनुषंगाने लेडी गागाने काही मेसेज पोस्ट केला आहे का याचा शोध सगळेजण घ्यायला लागले. मूळ संस्कृतमधील श्‍लोक पोस्ट करताना लेडी गागाने “इंग्लिश’ स्क्रीप्ट तशीच ठेवली आहे. त्यामुळे अनेकांना कदाचित तिने काय लिहीले आहे, हे समजलेच नसवे. मात्र ज्यांना समजले, त्यांना लेडी गागाच्या या पोस्टबद्दल खूपच आनंद झाला.

आतापर्यंत 73 हजारांपेक्षा अधिक जणांनी ही पोस्ट लाईक केली आहे. तर 20 हजारांपेक्षा अधिक जणांनी हे ट्‌विट रिट्‌विट केले आहे. भारतीय युजर्सनी लाईक करण्याचे प्रमाण अधिक आहे. लेडी गागाच्या फॅनमध्ये युवा वर्ग अधिक प्रमाणात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.