घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर- राजनाथ सिंह

लेह -भारतीय सशस्त्र दलांनी घुसखोरीच्या प्रयत्नांबद्दल चोख प्रत्युत्तर दिले. घुसखोरीची नापाक कृत्ये थांबवली जात नाहीत तोपर्यंत तसेच घडत राहील, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला.

शस्त्रसंधी भंगाच्या चिथावणीखोर कृत्याबद्दल भारतीय लष्कराने नुकताच पाकिस्तानला धडा शिकवला. भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील (पीओके) तीन दहशतवादी तळ उद्धवस्त केले. त्या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर राजनाथ बोलत होते. भारतीय सशस्त्र दले कधीच स्वत:हून आक्रमणाच्या पवित्र्यात नसतात. त्यामुळे आमच्याकडून प्रथम मारा करण्याचे कृत्य घडत नाही.

मात्र, भारताला अस्थिर आणि कमजोर करण्याच्या कुटील हेतूने पलिकडच्या बाजूने दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिला जातो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जम्मू-काश्‍मीरबाबत धडक पाऊल उचलल्याने पाकिस्तान बिथरला आहे. त्यातून काश्‍मीरमध्ये अशांतता निर्माण व्हावी या उद्देशातून त्या देशाने नापाक हालचाली वाढवल्या आहेत.

त्या देशाकडून भारतीय हद्दीत सातत्याने मारा केला जातो. तसेच, भारतीय हद्दीत दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, सतर्क आणि सज्ज असणारे भारतीय जवान पाकिस्तानी मनसुबे उधळून लावत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)