पुणे : कामगार आयुक्त पुणे विभागाच्या वतीने सन 2015 मध्ये घेण्यात आलेल्या क्लार्क, शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील उत्तरपत्रिकेत खाडाखोड करून बनावटी करण करत उमेदवारांच्या निकालात फेरफार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तरपत्रिका तपासण्याचे काम दिलेल्या कंपनीच्या संचालकाविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त मुजम्मील मुजावर (व्य.34,रा. जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. तर मे. एक्झान आटोमेशन प्रा. लिमी. कंपनी, सध्या कंपनीचे नाव मे.एस.बी.सिस्टिम प्रा.लिमी.( विश्व कुटीर शंकर घाणेकर मार्ग, दादर) असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनीचे नाव आहे. हा प्रकार 22 जानेवारी ते 10 मार्च 2017 या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार आयुक्त पुणे विभागाच्या वतीने सरळ सेवा भरती प्रक्रिया 2015 क्लार्क, शिपाई (वर्ग,क व ड) पदासाठी घेण्यात आली होती. दरम्यान घेतलेल्या परिक्षेतील लेखी पेपर तपासण्याचे काम संबंधीत कंपनीला देण्यात आले होते.