पिंपरी, दि. 20- डिझायनर फॅशन आणि सिल्व्हर ज्वेलरीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुशल्सने महाराष्ट्रातील आपले पहिले स्टोअर पिंपरीमधील मोरवाडी येथे सुरू केले आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या हस्ते या स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुशल्सचे मार्केटिंग संचालक अंकित गुलेच्छा, संचालक दिपेश गुलेच्छा, मनीष गुलेच्छा,कल्पेश गुलेच्छा, आणि नंदिश गुलेच्छा, तनसुख राज गुलेच्छा, आणि राजेंद्र गुलेच्छा सह इतर मान्यवर उपस्थित होते
हे स्टोअर 1500 चौरस फुटांवर विस्तारलेले असून त्यात पुरातन वस्तू (अँटीक), कुंदन, झायक्रॉन, टेम्पल आणि सिल्व्हर ज्वेलरीतील दहा हजारांपेक्षा जास्त डिझाईन उपलब्ध आहेत. उत्कृष्ट वातावरणातील हे सर्वात मोठे कलेक्शन सर्व वयोगट, प्रसंग आणि शैलीच्या दृष्टीने दागिने खरेदीचा विशेष अनुभव प्रदान करते.
यावेळी मृणाल ठाकूर म्हणाल्या, कुशल्समधील पारंपरिकपासून ट्रेंडी आणि आधुनिक डिझाइनचा व्यापक संग्रह ही मला त्यांच्यातील सर्वाधिक आवडणारी बाब आहे. फॅशनच्या प्रवाहांबरोबर राहणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक शैलीला अनुरूप संग्रह उपलब्ध झाल्यामुळे कोणत्याही प्रसंगी फॅशनेबल आणि आत्मविश्वासपूर्ण वाटणे सोपे होते.
कुशल्स फॅशन ज्वेलरीचे मार्केटिंग डायरेक्टर अंकित गुलेच्छा म्हणाले, चोखंदळ पुणेकर त्यांच्या दागिन्यांच्या प्रेमासाठी ओळखले जातात .ताज्या फॅशन ट्रेंडची त्यांना माहिती असते. कुशल्सचे कलेक्शन्स हे फॅशनबाबत सजग असलेल्या बाजारपेठेसाठी खास केलेले आहेत. आज देशातील 17 शहरांमध्ये 51 स्टोअर्ससह, कुशल्स हा किरकोळ क्षेत्रातील आपला ठसा संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात वेगाने विस्तारत आहे. लवकरच ते वाकड आणि विमाननगर येथील फिनिक्स मॉलमध्ये दोन स्टोअर सुरू करत आहेत. ग्राहक www.kushals.com वरसुद्धा ऑनलाइन खरेदी करू शकतात.
मोरवाडी, पिंपरी : अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या हस्ते कुशल्स फॅशन ज्वेलरीचे स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर.