पुणे – शहरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठाण ( ट्रस्ट) च्या वतीने आयोजित करण्यात आलेला कोथरूड कला महोत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिली.
प्रतिष्ठाणच्या वतीने 4 आणि 5 डिसेंबर रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात, कोथरूडकरांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी होती. मात्र, मागील तीन दिवसांपासून शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून पुढील काही दिवस हा पाऊस कायम राहणार आहे. त्यामुळे, हा महोत्सव तात्पुरता रद्द करण्यात आला असून कार्यक्रमाची पुढील तारीख व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सुतार यांनी सांगितले.