कोरोगाव भीमा दंगल : नवलखा यांचे आयएसआयशी संबंध!

सरकारविरोधात बुद्धिवंताची फौज उभी करण्याचे सोपवले काम

नवी दिल्ली – भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा हे आयएसआयच्या संपर्कात होते आणि दहशतवाद्यांना निधी पुरवल्याबद्दल अमेरिकेत शिक्षा ठोठावलेल्या आयएसआयच्या हस्तकासाठी त्यांनी दयेचा अर्ज दाखल केला होता, असा दावा भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.

2010-11मध्ये नवलखा हे अमेरिकेत तीनदा गेले होते. ते आयएसआयचा सक्रिय सदस्य असणाऱ्या सईद गुलाम नबी फई याच्या संपर्कात होते. अमेरिकेच्या जिल्हा न्यायाधीशाला त्यांनी फईवर दया दाखवण्यासाठी पत्रही लिहले होते. फईला एफबीआयने 2011मध्ये आयएसआय आणि पाकिस्तानी सरकारकडून कोट्यवधींचा निधी स्वीकारल्याबद्दल अटक केली होती, असे त्यात म्हटले आहे.

नवलखा हे फईशी फोन आणि इमेल्सद्वारे संपर्कात होते. नवलखा यांची आयएसआय जनरलशी त्यांची भरती करण्यासाठी फई याने भेट घालून दिली होती नवलखा यांचे नक्षलींशी असणारे संबंध दाखवल्यानंतर ते आयएसआयसाठी लाभदायक असल्याचे सांगण्यात आले होते, असे एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले. नवलखा हे आयएसआयच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्याकडे सरकारविरोधात बुद्धिवंताची फौज उभी करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते, असाही आरोप ठेवण्यात आला आहे.

गौतम नवलखा यांनी काश्‍मीरची फुटीरतावादी चळवळ आणि माओवादी चळवळीविषयी नवलखा यांनी अनेक व्याख्याने दिली होती. नवलखा यांच्याकडून हस्तगत केलेल्या कागदपत्रांमध्ये अनेक धोरणात्मक कागदपत्रांचा समावेश आहे. त्यावरून त्यांचा या चळवळीशी संबंध असल्याचे स्पष्ट होत असल्याचे एनआयएने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.