कोल्हापूर – शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून उत्सवकाळात देवीला परीधान करण्यात येणा-या दागिन्याची स्वछता आणि पॉलिश करून दागिने तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अंबाबाई देवीच्या दागिन्यांना चांगलीच झळाळी आली आहे
साडे तीन शक्ती पिठा पैकी एक महत्वाच पीठ म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापुरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईला देवीला नित्यविधीतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आज स्वच्छता करण्यात आली आहे. या मध्ये प्रमुख्याने देवीला मडवण्यात येणा-या सोन्याच्या दागिन्यां मध्ये कोल्हापुरी साज, मोहनमाळ, 2 वाळे , 2 कुडले , किरीट, पिंपळपान , 2 सातपदरी कंठी , जोंधळेपोत, चंद्रहार, लप्पा ,1 कोल्हापुरी जडावाचा साज, मोत्यांची माळ, चिंतामणी, दोन पदरी कंठी, चिंचपेटी, 2 मोतीहार , जडावाचा चारपदरी साज, सोन्याची तनपटी , चिंचपेटी, कंठी , या दागिन्यांनी नवरात्रौत्सवात देवीला मडवन्यात येतंय . तसच चांदीची प्रभावळ, पालखी, पालखींचे तोंड, दांडा, चौर्या मूर्ती, अभिषेकाची भांडी अशा विविध दागिन्यांची आणि देवीचे नित्यालंकार यासह खास नवरात्रात घातले जाणारे अलंकार यांची आज मंदीर परीसरात स्वच्छता केली.
दरम्यान यंदा कोरोनाच संकट पाहतात भक्ता विना यंदाचा नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. देवस्थान समितीच्या वतीने अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आता भक्तांना ऑनलाइन दर्शनाची सोय करण्यात आली आहे त्यामुळे भक्तांनी गर्दी करु नये असे आवाहन देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे
कोरोनाच्या संकटामूळ यंदाच्या नवरात्र उत्सव अगदी शांततेत पार पडणार असला तरी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन सज्ज झालं आहे.