कोम, सिंधू यांची ‘पद्म’साठी शिफारस

नवी दिल्ली : पद्म पुरस्कारांसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने प्रथमच सर्व महिलांचा खेळाडूंची शिफारस केली आहे. त्यात बॉक्‍सिंगमध्ये सहा वेळा विश्‍वविजेती असणाऱ्या एमसी मेरी कोमची पद्मविभूषणसाठी तर फुलराणी पीव्ही सिंधूची पद्मभूषणसाठी शिफारस करण्यात आली आहे.

बॉक्‍सिंगमध्ये सहावेळा सलग विश्‍वविजेतेपद पटकावणारी आणि सलग सात स्पर्धात पदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू आहे. तिच्या नावाची शिफारस पद्मविभूषण या द्वितीय सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी केली आहे. या पुरस्कारासाठी शिफारस झालेली ती पहिलीच महिला खेळाडू आहे. या पुर्वी हा पुरस्कार बुध्दीबळाचा जग्गजेता विश्‍वनाथन आनंद (2007), सचिन तेंडूलकर, गिर्यारोहक सर एडमंड हिलरी (2008) या खेळाडूंना मिळाला आहे. कोमला 2008मध्ये पद्मश्री, तर 2013मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला होता.

पीव्ही सिंधूने ऑगस्ट महिन्यात बॅडमिंटनचे विश्‍वविजेतेपद पटकावले होते. ऑलंपिक स्पर्धातही तिने भारताला पदक मिळवून दिले होते. तिची शिफारस पद्मविभूषण या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

याशिवाय कुस्तीगीर विनेश फोगट, टेबल टेनीसपटू मनिषा बात्रा, क्रिकेट कप्तान हरमप्रित कौर, हॉकीपटू राणी रामपाल, माजी नेमबाज सुमा शिरूर, गिर्यारोहक असणाऱ्या जुळ्या बहिणी तशी आणि नुंगशी मलिक यांच्या नावाची शिफारस पद्मश्री पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×