तब्ब्ल 62 लाख रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत
कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या ‘लक्ष्मी गोल्ड बुलीयन’ कंपनी वरील दरोडा प्रकरणी पोलिसांनी 5 दरोडेखोरांना अटक केली आहे.
तपासणी नंतर, या दरोडेखोरांकडून तब्ब्ल ’32 लाख रोख रक्कम’ आणि ’30 लाख रुपये’ असा 62 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हे दरोडेखोर कोल्हापूर आणि सांगितली जिल्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या 72 तासांत या पाचही दरोडेखोरांचा छडा लावला आहे.