पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक – अमित शहा

पुणे – विश्वचषक स्पर्धेत रविवारी झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 89 धावांनी हरवत धूळ चारली. विश्वचषका दरम्यान भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला हा सातवा विजय आहे. या विजयानंतर टीम इंडियावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजी क्रिकेटपटू, बाॅलीवूड कलाकार यांच्यासह राजकीय नेतेमंडळी सुध्दा भारतीय संघाला शुभेच्छा देत आहेत.

भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही देखील टीम इंडियाला ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शहा यांचे हे ट्विट सोशल मीडिया प्रचंड शेअर केले जात आहे आणि युजर्सकडून यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियादेखील व्यक्त करण्यात आल्या आहेत.

टीम इंडियाच्या विजयावर अमित शहा यांनी ट्विट केलं की,’टीम इंडियाचा पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक आणि याचे परिणामदेखील तसेच दिसून आले आहेत.’ पुढे त्यांनी असंही म्हटलं की, ‘शानदार खेळीसाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन. प्रत्येक भारतीय नागरिकाला या विजयावर गर्व आहे आणि याचा जल्लोष साजरा केला जात आहे.’

 

Leave A Reply

Your email address will not be published.