कोल्हापूर (प्रतिनिधी)- सीपीआरमधील ट्राॕमा आयसीयुमधील एका कक्षा मध्ये इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शाॕर्ट सर्किट झाल्याने आज पहाटे आग लागली होती.
या कक्षातील १५ रुग्णांना वेळीच सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आल्याने कोणत्याही प्रकारची जिवित हानी किंवा दुखापत झाली नाही, अशी माहिती अधिष्ठाता डाॕ चंद्रकांत मस्के यांनी दिली.
अग्निशमन दल, वरिष्ठ डाॕक्टर्स, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल जवान यांनी तात्काळ आग विझवली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लागलीच भेट देवून पाहणी केली.