संग्राम जगतापांना शेतकरी व कष्टकऱ्यांची जाण : संजय कोळगे

शेवगाव: नगरसेवक, महापौर .. आमदार असा कामाचा भक्कम अनुभव पदरी असलेले अभ्यासू व शेतकरी, कष्टकऱ्यांची जाण असलेल्या संग्राम जगताप यांना साथ देण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी केले. आघाडीचे नगर मतदार संघाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ गावोगावच्या कोपरा बैठकीत ते बोलत होते. कोळगे म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांनी ज्या क्षेत्रात काम केले तेथे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. खासदार म्हणून निवडून गेल्यावर ते नगर दक्षिणचे सर्व प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्‍वास त्यांनी दिला.

यावेळी पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, राष्ट्रवादी महिलांच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. मेधा कांबळे, बाजार समितीचे सभापती ऍड. अनिल मडके, संचालक संजय फडके, युवक कार्यकर्ते अजिंक्‍य लांडे, समीर शेख, फिरोज पठाण, वहाब शेख, कॉंग्रेसचे डॉ. अमोल फडके, प्रकाश तुजारे, रोहन साबळे, अरबाज शेख आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. मेघा कांबळे म्हणाल्या, राष्ट्रवादी हा विचाराचा पक्ष आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महिला आरक्षण आणि शेतकऱ्यांबद्दल घेतलेल्या भूमिका देशाला मार्गदर्शक ठरल्या आहेत. त्यांनी नगर दक्षिण साठी अत्यंत जोखून उमेदवार दिलेला आहे.

मुस्लिम कार्यकर्ते फिरोज पठाण म्हणाले, भाजपनेच हिंदू – मुस्लिमांमध्ये तेढ वाढविली. सभापती घुले म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील पवारांबरोबर होते.त्याच मार्गाने घुले परिवार काम करत असून पुढेही करत राहणार आहोत. जगताप हे मतदारसंघातील असल्याने आपली सुखदुःखे अधिक जाणून आहेत. अडचणीच्या वेळी तेच धावून येऊ शकतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करतात मग शिवस्मारकाच्या कामाला एकही वीट लागली नाही. मात्र कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले तेव्हा 18 कोटी रुपये त्याच्या जाहीरातीवर खर्च झाले. संजय फडके यांनीही जगताप हेच योग्य उमेदवार असल्याचे सांगितले. कॉ. संजय नांगरे यांनी प्रास्ताविकात नोटाबंदी व वाढत्या भ्रष्टाचारावर सडकून टीका केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.