Asha Bhosle Birthday: आपल्या मखमली आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने सात दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या सर्वांच्या लाडक्या आशा भोसले यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत संगीताला नवा आयाम दिला आहे. आशा भोसले यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. आशा भोसले यांचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. आशा भोसले कधीही कुणापुढे झुकल्या नाही आणि त्यांनी परिस्थितीशी तडजोड केली नाही त्या आपल्या आयुष्याचे निर्णय आपल्या मतानुसार घायचा.. आशा भोसले यांच्या वाढदिवशी त्यांची आणि आरडी बर्मन यांची म्यूजिकल लव स्टोरी जाणून घेऊया.
आशा भोसले आणि पंचम दा या दोघांचे पहिले लग्न मोडले होते. अशात संगीत त्यांच्या प्रेमाचे कारण बनले. संगीतानेच दोघांना जवळ आणले. आशा आणि पंचम दा यांनी मिळून अनेक सुपरहिट गाणी दिली. पण दोघांनाही लग्नासाठी बराच काळ वाट पाहावी लागली.
पंचम दा यांना आशासोबत लग्न करायचे होते. आशा भोसले यांना पहिल्या पतीपासून तीन मुले होती. अशात पंचम दाच्या आईला हे नाते मान्य नव्हते. पंचम दा आईच्या विरोधात गेले नाही. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्यांनी आशा भोसले यांच्याशी लग्न केले. लग्नाच्या 14 वर्षानंतर पंचम दा यांनी जगाचा निरोप घेतला. पंचम दा गेल्यानंतर आशा भोसले खूप तुटल्या होत्या.
आशा भोसले यांनी एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील अनेक अनुभव सांगितले यावेळी त्यांनी त्यांच्या म्यूजिकल लव स्टोरीबद्दल एक किस्सा शेअर केला होता. या लव स्टोरीत त्यांनी एकमेकांच्या भांडणाची माहिती दिली. दोघांमध्ये भांडण झाल्याचे त्यांनी सांगितले. दोघेही 15 दिवस एकमेकांशी बोलले नाहीत. गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओत भेटल्यावर सुद्धाआम्ही बोललो नाही. मग गाणे वाजले – जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाह, वो फिर नहीं आते… वह फिर नहीं आते’. यानंतर आम्ही दोघींनी एकमेकांकडे बघितले आणि बोलायला लागलो. आमच्या अतूट नातं होत.
पंचम दा, आशा भोसले या दोघांनाही त्यांच्या आयुष्याच्या जोडीदारापासून विभक्त होण्याचा अनुभव आणि वेदना जवळपास सारख्याच होत्या, त्यामुळे दोघांमधील प्रेमही खोलवर होते. एके दिवशी पंचम दा यांनी आशा भोसले यांना लग्नासाठी प्रपोज केले. पण, आशाने लग्नाला साफ नकार दिला. पंचम दा आशा भोसले यांच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होते . मात्र, आशाच्या नकाराचे वय हे कारण नव्हते. खरे तर पतीच्या निधनाच्या दु:खातून त्या बाहेर आल्या नव्हत्या. पण, पंचम दा हार मानणारे नव्हते. कसेबसे त्यांनी आशा भोसले यांना लग्नासाठी सहमत केले. लता मंगेशकर यांनीही पंचम दा यांना या कामात खूप मदत केली. अखेरीस, सर्वकाही सेटल झाले आणि जोडप्याने 1980 मध्ये लग्न केले.