भारतीय क्रिकेटपटू आणि सिनेविश्वातील तारकांचे समीकरण पूर्वीपासूनचे आहे. अनेक क्रिकेटपटूंचे लग्न सिनेतारकांबरोबर झाले आहे. यामध्ये नवीन जोड्यांची भर देखील पडते आहे. भारतीय टीममधील शीलेदार फलंदाज केएल राहुल आणि सुनील शेट्टीच्या नावाचीही यामध्ये भर पडली आहे.
आथिया शेट्टीच्या वाढदिवसाच्या दिवशी राहुलने तिला शुभेच्छा देताना हे रिलेशन उघड केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून राहुल आणि आथिया शेट्टी यांच्यातील रिलेशनशीपची चर्चा सुरू होती. दोघांनाही अनेकवेळा एकमेकांबरोबर बघितले गेले आहे. एकत्र सुटी एन्जॉय करतानाही हे दोघे दिसले होते.
मात्र आता केएल राहुलने या रिलेशनशीपवर शिक्कामोर्तब करून टाकले आहे. तर आथियानेही हे रिलेशनशीप अधिकृतपणे स्वीकारले आहे. अलीकडेच आथियाचा वाढदिवस झाला आणि राहुलने सोशल मीडियावरून आथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. त्याने आथियाबरोबरचे दोन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
एका फोटोत दोघेही एकमेकांना बिलगलेले दिसत आहेत. “हॅपी बर्थ डे माय लव्ह’ अशी कॅप्शन राहुलने या फोटोला दिली आहे. यावर कॉमेंट म्हणून आथियाने वर्ल्ड इमोजी पोस्ट केली आहे. त्यावरून या रिलेशनशीपला तिने हिरवा कंदील दिल्याचे स्पष्ट होते.