मुंबई – अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) या सध्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेक व्हिडिओ आणि फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्या चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
किशोरी शहाणे यांनी त्यांच्या फार्महाऊसवर चुलीवर जेवण बनवलं आहे. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या चुलीवर जेवण बनवताना दिसत आहेत. किशोरी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या तव्यावर सुरमई फ्राय करताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी भाकरी देखील बनवली आहे. इतकेच काय तर, या व्हिडीओमध्ये ‘मस्त झालं आहे, खायला या’असं देखील सांगत आहे.
यापूर्वी त्यांनी अनेक डान्सचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, “मोरूची मावशी’ या सुप्रसिद्ध व्यावसायिक नाटकाने त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे सर्व स्तरावर कौतुक झाले.
View this post on Instagram
त्यानंतर “प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात केली. पुढे त्यांनी एकापेक्षा एक हटके आणि सुपरहिट चित्रपट दिले. किशोरी शहाणे यांनी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले आहे.