शिवकुमार यांच्या कन्येला ईडीकडून समन्स

नवी दिल्ली  -कॉंग्रेसचे कर्नाटकमधील नेते डी.के.शिवकुमार यांच्या कन्या ऐश्‍वर्या यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. शिवकुमार यांच्याविरोधातील मनी लॉण्डरिंग प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी ऐश्‍वर्या यांना 12 सप्टेंबरला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

शिवकुमार 2017 मध्ये कन्येसमवेत सिंगापूरच्या सहलीवर गेले होते. त्यासंदर्भात शिवकुमार यांनी दिलेल्या जबाबाविषयी ऐश्‍वर्या यांच्याकडे विचारणा होण्याची शक्‍यता आहे. मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचा जबाब नोंदवला जाईल.

कॉंग्रेसचे कर्नाटकमधील संकटमोचक अशी ओळख असणारे त्या राज्याचे माजी मंत्री शिवकुमार यांना ईडीने 3 सप्टेंबरला अटक केली. ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आणि हवाला व्यवहार केल्याचे आरोप आहेत. त्यावरून प्राप्तिकर विभागाने याआधीच त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्याचा आधार घेऊन ईडीने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये शिवकुमार यांच्याविरोधात मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×