पंढपूर – विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण. हा सण वेगवेगळ्या कारणांसाठी देशाच्या विविध भागात साजरा केला जातो. काही भक्त तो विजया दशमी म्हणून साजरा करतात, दुर्गा पूजेचा शेवट, देवी दुर्गाचा महिषासुर राक्षसावर विजय म्हणून साजरा करतात.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील विविध मंदिरांमध्ये आकर्षक सजावट केली आहे. लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेलं पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुद्धा फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिरात फुलांचा दरवळ आणि भक्तीचा नाद दिसून आला.
यावेळी मंदिरात तब्बल 500 किलो विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिरातील ही आकर्षक सजावट पुण्यातील राम जांभूळकर या भाविकाने केली आहे. अशी माहहती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.