सेऊल – रशियाचा 6 दिवसांचा दौरा आटोपून उत्तर करियाचे प्रमुख किम जोंग उन (kim jong un) आज मायदेशी परतले. रशियातील अतिपूर्वेकडील आणि उत्तर कोरियाच्या सीमेपासून 200 किलोमीटरवरील आर्टियोम रेल्वे स्थानकावरून किम जोंग यांची सशस्त्र रेल्वे उत्तर कोरियाच्या दिशेने मार्गस्थ झाली,
तेंव्हा रशियाच्या सैन्य दलाच्या वाद्यवृंदाने त्यांना “फेअरवेल ऑफ स्लावियंका’ या समरगीताची धून वाजवून निरोप दिला, असे रशियातील वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.
किम जोंग उन यांना निरोप देण्यासाठी रशियातील नैसर्गिक स्रोत मंत्री अलेक्झांडर कोझलोव आणि प्रिमोरये प्रांताचे गव्हर्नर ओलेग कोझेमायाको उपस्थित होते. निरोप समारंभाच्यावेळी रशियाच्या लष्करी वाद्यवृंदाने रशिया आमि उत्तर कोरिया दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताची धून वाजवली.
परतीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी किम यांनी रस्की बेटावरील फार इस्टर्न फेडरल युनिव्हर्सिटी या विद्यापिठाला भेट दिली आणि स्थानिक मत्स्यालयामध्ये वॉलरस शो देखील बघितला.
शनिवारी किम यांनी रशियाचे संरक्षण मंत्री सर्जी शोयगू यांच्या समवेत व्लादिवोस्तोक विमानतळाशेजारील बॉम्बर विमानांचा तळ बघितला आणि शापोशनिकोव्ह या विनाशिकेलाही भेट दिली.
शोयगू यांनी किम यांनी किम यांना रशियाची अत्याधुनिक किनझाय क्षेपणास्त्रे देखील दाखवली. किम आणि शोयगू यांच्यात प्रादेशिक सुरक्षिततेबाबत चर्चा झाली आणि सुरक्षाविषयक तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानाबाबत विचारांची देवाण घेवाण केली.
रशियाने भेट दिली ड्रोन
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी किम यांना मैत्रीची भेट म्हणून पाच एक्सप्लोसिव्ह ड्रोन आणि एक बुलेटप्रुफ जॅकेट भेट म्हणून दिले आहे. किम यांनी 2011 मध्ये पुन्हा देशाचे अध्यक्षपद स्विकारले तेंव्हापासून ते आणि पुतीन यांची ही दुसरी भेट होती.
यापूर्वी 2019 मध्ये किम आणि अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष ट्रम्प यांच्यात व्एितनाममध्ये ऐतिहासिक चर्चा झाली होती. मात्र दोनच महिन्यात ही शिष्टाई असफल झाली. त्यानंतर एप्रिल महिन्यात किम आणि पुतीन यांची भेट झाली होती.