राजगुरुनगर -खेड पोलीस ठाण्यातील निरीक्षक अरविंद चौधरी करोनामुक्त होउन परतल्यानंतर खेड पोलीस ठाण्यातील सहकारी पोलीस व ते राहत असलेल्या नागरिकांनी ‘करोना योद्ध्याचे’ फटाके वाजवून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. अरविंद चौधरी हे गेले चार महिने खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत करोना योद्धा बनून काम करत होते.
मात्र कर्तव्य बजावत असतानाच (दि. 18) त्यांना एका आजाराचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी करोना चाचणी करून घेतली. त्यात स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. आज (दि. 24) त्यांना रुग्णालयातून डिचार्ज देण्यात आला.