नगर -पावसाळा सुरू झाला असून, या काळात मोठ्या संख्येने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी वृक्षारोपणाचे उपक्रम हाती घेतले जातात. प्रत्येकाने आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने एक तरी झाड लावून ते जगवून पुण्य कमवावे. सुरेखा तोरडमल यांनी सामाजिक भावनेतून बारदरी परिसरात विविध वनस्पतींच्या वृक्षारोपणाचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. वृक्षारोपण करायचे असेल, तर चांगल्या वनस्पतींचे करा, असे आवाहन सुधीर पोटे यांनी केले.
अखिल गुरव समाज संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा तोरडमल यांच्या वाढदिवसानिमित्त नगर तालुक्यातील बारदरी परिसरातील हनुमान मंदिर परिसर, चांदबीबी महाल परिसर, ऐतरनाथ महाराज या निसर्गरम्य ठिकाणी डोंगर परिसरात वड, पिंपळ व चिंच यांसारख्या वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी अशोक तोरडमल, सागर तोरडमल , किरण तोरडमल, अनिल पोटे, राहुल पोटे, गणेश पोटे, वैभव पोटे, अरुण पोटे, अमोल पोटे, यश तोरडमल आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना तोरडमल परिवाराच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले. तोरडमल म्हणाल्या की, अखिल गुरव समाज संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व समाजबांधव विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो.