अकलूज – खंडाळी (ता. माळशिरस) येथील जिल्हा परिषद शाळेने “स्वच्छ शाळा सुंदर शाळा” उपक्रमांमध्ये
माळशिरस तालुक्यात इयत्ता पहिली
ते चौथी बहुशिक्षकी शाळांच्या
प्राथमिक गटातून व्दितीय क्रमांक
मिळवून खंडाळी गावासह शाळेची मान उंचावली आहे. आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेचा निकाल गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी नुकताच जाहीर केला.
खंडाळी येथील जिल्हा परिषद शाळेत सध्या चार महिला शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व रणरागिणीनीं स्वतः शाळेचा आंतरबाह्य कायापालट केला आहे.
शाळाबाह्य मुलांसाठ बालरक्षक मोहीम
प्रभावीपणे राबविण्यात त्यांना यश आले आहे. कोरोनानंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शाळेने ९१ पटसंख्येवरून १४२ पर्यंत मजल
मारली आहे.
मुख्याध्यापिका सारिका महाजन, शिक्षिका छाया पोळ, शीतल बिराजदार, कविता हिंगमिरे यांनी
हातात ब्रश घेऊन शाळेची रंगरंगोटी केली.
फुलझाडांनी आणि औषधी वनस्पती ने सजवलेली परसबाग यामुळे शाळेच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. त्यामुळेच शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
याकामी खंडाळी गावचे सरपंच बाबुराव पताळे पाटील, शाळा
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदा चव्हाण, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे (पुरस्कार प्राप्त) माजी अध्यक्ष रणजितसिंह कदम पाटील व ग्रामस्थाचे सहकार्य लाभले, अशी
माहिती मुख्याध्यापिका सारिका महाजन यांनी दिली.
शाळेच्या उज्वल यशाबद्दल गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख,
शिक्षण विस्ताराधिकारी महालिंग नकाते, केंद्रप्रमुख आनंद कचरे यांनी सर्व शिक्षिकांचे अभिनंदन केले.