अकलूज – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांच्या आवाहनास प्रतिसाद देत खंडाळी (ता. माळशिरस)
येथे शनिवारी (दि. ११) 460 नागरिकांना कोविशील्ड
लसीकरण करण्यात आले. या मोहिमेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे
प्रतिसाद दिला.
यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने टोकन पद्धत अवलंबल्याने लसीकरण सुरळीत पार पडले. यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी साबळे व पांडुरंग किर्दकर यांचे मोलाचे योगदान लाभले. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका,शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण अभियान यशस्वीपणे पार पाडले.
याप्रसंगी सरपंच बाबुराव पताळे पाटील, ग्रामविकास अधिकारी मोहनराव मिटकल, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. लसीकरण मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.