रांजणगाव गणपती – निमगाव भोगी येथील जगताप वस्ती येथे बाबाजी रंगनाथ जगताप यांच्या गायीवरती बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले होते. तद्नंतर निमगाव भोगी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर-पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी या घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने वनविभाग शिरूर येथील वनविभागचे अधिकारी संजय पवने यांना संपर्क साधला.
वनविभागाचे अधिकाऱ्यांनी निमगाव भोगी (जगताप मळा) येथे येऊन पिंजरा लावला. निमगाव भोगी ग्रामस्थांकडून शेखर पाचुंदकर पाटील, वनविभागाचे अधिकारी संजय पवने सहकार्यांचे आभार मानले. येथील माजी सरपंच सखाराम रासकर, विजय खरमाळे, बाबाजी जगताप उपस्थित होते.