चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धुमाकुळ: मृतांचा आकडा हजारांवर

40 हजाराहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग

बीजिंग : चीनमध्ये कोरोना व्हायरस प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हायरसमुळे मृतांचा आकडा हजारांवर पोहोचला आहे. कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे चीनमध्ये आतापर्यंत 1016 लोकांचा मृत्यू झाला असून 40 हजाराहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. नेशनल हेल्थ कमीशनने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कोरोनामुळे आणखी 97 लोकांचा मृत्यू झाला असून त्यातील 91 लोक हुबेईचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

नॅशनल हेल्थ कमिशनने दिलेल्या माहितीनुसार, हीलोंगजियांग, जिआंगशी, हैनान आणि गान्सूमधून या ठिकाणांहून एका-एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर चीनमधील 31 राज्यांमध्ये आतापर्यंत एकून 908 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी 296 रूग्ण कोरोना व्हायरसमुळे आजारी होते. तसेच एकूण 3281 लोकांना उपचारानंतर हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आलं आहे. चीनी आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस सेवेरे एक्ट्यू रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स)चं दुसरं रूप आहे. दरम्यान, 2002-2003मध्ये हॉन्गकॉन्ग आणि चीनमध्ये या आजारामुळे 650 लोकांचा मृत्यू झाला होता. याव्यतिरिक्त संपूर्ण जगभरातील 120 लोकांचा मृत्यू झाला होता.

चीनच्या वुहान येथे 30 डिसेंबर 2019मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. स्थानिक मासळी बाजारातून सात रुग्ण आले होते. या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यांनी या आजाराचे निरिक्षण केल्यानंतर हा कोरोना व्हायरस असल्याचे त्यांना आढळून आले. गेल्या महिन्याभरापासून चीनमध्ये या आजाराने आतापर्यंत हजाराहून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये तब्बल 24 हजार जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तैवानच्या एका वृत्तसंस्थेने केला आहे. चीन मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.